Breakingग्रंथपाल कार्यशाळा : ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाचे काम करू इच्छित असणाऱ्या युवा - युवतीसाठी संधी


आंबेगाव : ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाचे काम करू इच्छित असणाऱ्या युवा - युवतीसाठी ग्रंथपाल कार्यशाळेचेे आयोजन शहीद राजगुरू ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, फलोदे व आदिम संस्था, आंबेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


आंबेगाव तालुक्यातील काही गावांत येत्या काळात ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहेत. या ग्रंथालयासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वायाळ व माजी नायब तहसीलदार विजय केंगले हे ग्रंथालय सुरू करण्यासाठी सहकार्य करत आहेत. या ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाचे काम करू इच्छित असणाऱ्या युवा - युवतीसाठी 'ग्रंथपाल कार्यशाळा' गुगल मिट वर दि. २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.


या कार्यशाळेस नरेंद्र लांजेवार हे ग्रंथालय,परिवर्तनाची प्रयोगशाळा या विषयावर, तर डॉ.अमोल वाघमारे हे ग्रंथालय, गाव विकास आणि मी, तर अशोक जोशी हे ग्रंथालयाचे दैनंदिन कामकाज व नोंदवह्या यावर मार्गदर्शन करणार आहेत.जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.- 

https://meet.google.com/het-knkk-fod

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा