Breaking


मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नावर आमदार विनायकराव मेटे सभागृहात आक्रमक


तापी, गोदावरी आणि पश्चिम वाहिनी मधून मराठवाडयात येणाऱ्या पाण्याबाबतच्या पाच  योजनांच्या विलंबास काेण जबाबदार? - आ. मेटेंचा सवाल.


मुंबई : आ.विनायकराव मेटे यांनी आज सभागृहामध्ये मराठवाड्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आणि प्रश्न मांडला. त्यांनी सांगितले की, मराठवाड्याला मिळणाऱ्या पाण्याबाबत अनेक  योजना अर्धवट आहेत. काहींना मान्यता द्यायची बाकी आहे, काही पुढे ठेवूया असे सांगितले जाते. असे वर्षानुवर्षे मराठवाड्याच्या माथी हेच आलेले आहे.


कृष्णा खोरे प्रकल्पामधूनही 21 टीएमसी पाणी देणे बाबत आश्वासन दिले होते. त्याचं कुठं काय झालं अजूनही काही मेळ लागत नाही. अनेकयोजनेबाबत सुद्धा तसंच चालू आहे. तापी, गोदावरी आणि पश्चिम वाहिनी मधून मराठवाडयात येणारं पाणी त्याच्यातल्या शेवटच्या ज्या पाच योजना आहेत त्या पाच योजनेला विलंब का झाला? त्याची जबाबदारी कोणाची आहे? आणि आता आपण मान्यता देणार असाल तर तशी आर्थिक तरतूद करून मान्यता देणार का? २१६१ घनफूट पाणी वळावयांचे सर्वेक्षण सविस्तर प्रकल्प तयार करण्याच्या कामे बजेटमध्ये आपण तरतूद  करणार आहात का?आणि शेवटचा प्रश्न हा मोठा  विषय असल्यामुळे संबंधित मंत्रीमहोदयांनी स्वतःकडे अथवा मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक लावून मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सविस्तर चर्चा करुन निर्णय घेणार का ?


या प्रश्नावर जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री

जयंत पाटील यांनी उत्तर दिले त्यांनी असे सांगितले की या प्रकल्पाला उशीर झालेला नाही. हे जे पाच प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव आहेत ते थांबलेले नाहीत तर याबाबत मान्यतेसाठी SLTC(मिठ तलाव तांत्रिक केंद्र) ने क्लिअर केलेली असुन MWRRA (महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण)कडे  संचिका गेलेले आहेत, अशा वेगवेगळ्या स्टेजेसवर कामे प्रगतीपथावर आहेत. यापूर्वीची फार सोपी पद्धत होती पण मधल्या काळात इतक्या स्टेजेस तयार करण्यात आलेल्या आहेत की, पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्रा पासून सुरू होते ते जवळपास चार-पाच वेळा मागेपुढे फाईल होतात त्यामुळे SLTC मध्ये जाऊन त्याची निर्णये करून घ्यावी लागतात त्यांची प्रोसिजर लॉंग आहे. याबाबत मी दर महिना दोन महिने आढावा घेत आहे.


सरकारची इच्छा आहे की हे जे वळण बंधारे आहेत ते जास्तीत जास्त गतीने होणार आहेत. या योजना पहिल्या झटक्यात पूर्ण करून ते पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचे जे उद्दिष्ट आहे ते काही प्रमाणात सफल होईल, असा आम्हाला विश्वास आहे. लिफ्ट करून घेणे बाबतच्या या योजना आहेत. व ज्या दुसर्‍या योजना आहेत. मी त्याचा उल्लेख केला की दमणगंगा, वैतरणा व  गोदावरी या नद्यांना मोठ्या लिफ्ट आहे साधारणतः ३००-४०० मीटर चा लिफ्ट आहेत. त्या काही सोप्या लिफ्ट नाहीत त्यामुळे त्या योजना एका gravity च्या योजना मार्गी लागल्या की आपण ह्या योजना घेणार आहोत त्यासाठी आपल्याला एम डब्ल्यू डी ए कडून प्रोजेक्ट रिपोर्ट यायचा आहे. त्यानंतर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा