Breaking15 मार्च : खाजगीकरण विरोधी दिवस, अंगणवाडी कर्मचारी होणार सहभागी !महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा निर्णय


मुंबई :  संपूर्ण देशभरातील कामगार संघटनांच्या कृती समितीने १५ मार्च २०२१ रोजी खाजगीकरण विरोधी दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती सहभागी होणार आहे. तसेच आपापल्या तालुका व जिल्ह्यातील तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ते पंतप्रधानांना पाठविण्याची विनंती करणार असल्याची माहिती, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या महासचिव शुभा शमिम यांनी सांगितले.


सार्वजनिक उद्योग व सेवांचे खाजगीकरण, शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे, कामगार विरोधी चार श्रमसंहिता, पेट्रोलजन्य पदार्थ व जीवनावश्यक वस्तूंवरील भरमसाठ करांमुळे वाढणारी महागाई, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केले जाणारे शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण, वीज कायद्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी व लहान उद्योगांना संकटात टाकणारे बदल या सर्व निर्णयांंविरोध हे आंदोलन करणार असल्याचे माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा