Breaking


६ मार्च : ऐतिहासिक 'किसान लाँग मार्च'ला ३ वर्षे पुर्ण


मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली ६ मार्च २०१८ रोजी नाशिक येथून सुरु झालेल्या ऐतिहासिक 'किसान लााँँग मार्च' ला आज ३ वर्षे पुर्ण झाली.


किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या नाशिक ते मुंबई मार्च मध्ये  ४० हजार शेतकरी सहभागी झाले होते. तत्कालीन भाजपाच्या नेतृत्वातील फडवणीस सरकार, शेतकरी आंदोलनापुढे नमले होते, व इतिहासात पहिल्यांदा राज्याच्या मुख्य सचिवांना आंदोलनाला लेखी आश्वासन द्यावे लागले होते.


लाँग मार्चची सांगता १२ मार्च रोजी झाली १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेची सुरुवात झाली होती. 


ऐतिहासिक किसान लाँग मार्च ने महाराष्ट्र आणि देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले होते. शेतकरी आंदोलनाने शेतकरी प्रश्न राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. 


लाँँग मार्च मुळे आदिवासींंच्या वनजमीनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटला, परंतु अजूनही वनजमीनी कसणाऱ्या आदिवासींच्या नावावर झालेल्या नाहीत. तो लढा अखिल भारतीय किसान सभा लढत आहे. या आंदोलनात देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करण्याची प्रमुख मागणी होती. परंतु लेखी आश्वासन देऊनही ते मुद्दा सुटलेला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा