Breakingमाजलगांव येथे डीवायएफआय व बीड जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटनाच्या वतीने शहीद दिनानिमित्त अभिवादन


माजलगांंव (बीड) : शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतीकारकांना 23 मार्च 1931 साली फाशी देण्यात आली. तेव्हा पासून 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज (दि.23) आझादनगर येथे शहीदांना आदरांजली अर्पण करुन शहीद दिन साजरा करण्यात आला. व क्रांतिकारी गीतांचे गायन अर्पिता सक्राते, आनंद सक्राते, रणवीर सक्राते, विशाखा सक्राते यांनी केले. 


इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात क्रांतीची मशाल घेवून शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलेल्या शहिद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या महान क्रांतीकारकांनी देशासाठी दिलेल्या बलिदानातून युवकांना प्रेरणा मिळावी व त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणुन 23 मार्च हा शहिद दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. शहिदांचे विचार आचरणात आणून त्यांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य साकार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला पाहिजे, असे विचार बीड जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काॅ. सादेक पठाण यांनी मांडले.


यावेळी डीवायएफआय चे शेख महेबुब, विठ्ठल सक्राते, एकनाथ सक्राते, दिनकर जोगडे, सय्यद फारोख, शेख फयाज, सय्यद जफर, शेख अख्तर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सय्यद जफर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा