Breakingमयुरेश कोंडे याची जर्मनस्थित रोझेनहाइम विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड


पुणे : मयुरेश बाबासाहेब कोंडे या विद्यार्थ्यांची जर्मन सरकारच्या रोझेनहाइम विद्यापीठाने मेकाट्रोनिक्स मॅनेजमेंटच्या उच्च पदवीसाठी निवड केली आहे. त्याने VIT (Vellore Institute of Technology ) कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअर ची पदवी प्राप्त केली आहे. HDFC CREDILA बँकेने त्याच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय जाहीर केले आहे.


मयुरेश कोंडे म्हणाला की, भारतातून दरवर्षी मास्टर डिग्रीसाठी (MS) भारतातील गुणवंत विद्यार्थ्यांची जर्मन विद्यापीठे निवड करतात. इंग्रजी, जर्मन, हिंदी सह मातृभाषा मराठी मला येते. माझी निवड मेरिटवर झालेली आहे. 


मेकाट्रोनिक्स (Mechatronics) हा अलीकडच्या काळातील हा दोन वर्षांचा मल्टीलेव्हल अभ्यासक्रम आहे. इंजिनिअरिंग मधील रोबोटीक, संगणकीय उच्च तंत्रज्ञानावरील हा कोर्स आहे. चार वर्षापूर्वी पासुनच MS करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. यामध्ये मला माझ्या आई वडीला. सहीत भरपूर जणांचे योग्य असे मार्गदर्शन मिळाले. दहावी पर्यंतचे शिक्षण टाटा मोटर्स पिंपरीच्या विद्यानिकेतन शाळेमध्ये झाले.


एचडीएफसी चे पुणे सेल्स मॅनेजर पंकज माळी यांनी सांगितले की, दरवर्षी आम्ही फक्त विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यानाच युरोप, इंग्लंड, अमेरिकेतील पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्थसहाय्य देतो. आमचे इंटरनॅशनल नेटवर्क मुलांना कोणत्याही प्रकारची आर्थिक चणचण भासू देत नाही.


एचडीएफसी चे पुणे जनसंपर्क अधिकारी पंकज माळी यांनी सांगितले की, सध्याच्या काळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही पालकांच्या चिंतेची बाब आहे. कितीतरी पालक त्यांच्या मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मालकीची शेती आणि घरे विकतात. कारण त्यांना मााहित नसते की, मुलांची बुद्धिमत्ता, परदेशी भाषा प्राविण्य हेच त्यांचे भांडवल असते. आम्ही पालकांच्या घरी येऊन पूर्ण माहिती देतो. मुलामुलींचे प्राविण्य हाच निकष लावून होतकरू विद्यार्थ्यांच्या संपूर्ण गरजाची शिक्षण पूर्ण होईपर्यंत काळजी घेते. मयुरेश कोंडे ला 20 लाखाचे अर्थसहाय्य दिले आहे. आमचे इंटरनॅशनल डेबिट कार्ड मुलांना दिले जाते. विमान प्रवास, विद्यापीठातील शैक्षणिक खर्च, परदेशातील अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य विमा, अंतर्गत प्रवास इ. सर्व खर्च विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे विशेष प्राविण्य मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणाची स्वप्ने पूर्ण होतात. महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडो मुले आज परदेशात आधुनिक शिक्षण घेऊन युरोप अमेरिकेतील मोठ्या पदावर काम करत आहेत.


मयुरेशचे वडील बाबासाहेब कोंडे यांनी सांगितले की, शैक्षणिक कर्ज मिळवणे हा पालकांसाठी मोठा मनस्ताप असतो. सरकारी बँकांकडून अर्थसहाय्य लगेच मंजूर होईल याची खात्री नसते. मात्र फक्त सात दिवसात एचडीएफसी ने अर्थसहाय्य दिले. मी त्याच्या टीमचा आभारी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा