Breaking


पिंपरी चिंचवड : स्मार्ट सिटीत गरिबांचे स्थान काय ? - काशिनाथ नखाते


पिंपरी चिंचवड महापालिकेवर 'अ' क्षेत्रीय कार्यालयावर फेरीवाल्यांचे आंदोलन


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अ  क्षेत्रीय कार्यालयांतर्गत संत तुकाराम व्यापार संकुल परिसरामध्ये सुमारे पंचवीस वर्षापासून व्यावसायास निर्बंध व विक्रेत्यांना अटकाव करण्यासाठी म्हणून  महानगरपालिके तर्फे बेकायदेशीरपणे लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात येत आहेत, याला महासंघाने तीव्र विरोध केला असून यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देत स्मार्ट सिटी मध्ये गरिबांनी जगायचे का नाही ? असा सवाल महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी आज केला.


नॅशनल हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे मनपाच्या 'अ' क्षेत्रीय कार्यालयावर सामाजिक अंतर ठेऊन आज तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी नखाते बोलत होते.


यावेळी कार्याध्यक्ष राजू बिराजदार, मनपा समिती सदस्य राजेंद्र वाकचौरे, संघटक प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मधुकर वाघ, अंबालाल सुखवाल, वसंत जाधव प्रकाश साळवे, ओम प्रकाश , प्रकाश मेहेर, फरीद शेख, रामा बिराजदार, देवीलाल आहेर, काशीम तांबोळी व अन्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा