Breakingनांदेड : SFI तर्फे MPSC परिक्षेबाबत तहसिलदारांना निवेदन


नांदेड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने माहूर तहसीलदारांना निवेदन देत परिक्षा पुढे न ढकल्याबाबत निवेदन देण्यात आले.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाचे कारण देऊन या वर्षीच्या राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ही पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले, याचा एसएफआय ने निषेध केला आहे.


आधीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली असताना,राज्य सरकारचे हे पाऊल म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी अवस्था आहे. या निर्णयाविरोधात सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांचा क्षोभ उसळला आहे. याची दखल आयोगाने आणि सरकारने घेत परिक्षा २१ मार्चला घेण्याचे जाहीर केले आहे.


निवेदन देतेवेळी एसएफआय नांदेड जिल्हा सहसचिव कॉम्रेड प्रफुल्ल कउडकर, राहुल भगत, आकाश कांबळे, अरविंद कांबळे व माहूर शहरातील राजश्री शाहू महाराज अकॅडमी, अभ्यासिकेचे विध्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा