Breakingशिवसंग्रामच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आ.विनायकराव मेटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान


बीड : आज शिवसंग्राम भवन, बीड येथे आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये अभिजित व्यंकटराव देशमुख यांची परळी (वै.) तालुकाध्यक्षपदी, तर शिवाजी गंगाराम भोसले यांची पाटोदा तालुका उपाध्यक्षपधी व नारायण अंकुश जाधव याची डोंगरकिन्ही सर्कल प्रमुखपदी निवड करुन नियुक्तीपत्र देवून पुढील कार्यास सुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


तसेच शिरसाळ्याचे बाळासाहेब वैजनाथ पाथरकर यांनी शिवसंग्राम मध्ये आ.विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. 


यावेळी बोलतांना आ.विनायकराव मेटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन व शिवसंग्राम चे विचार आत्मसात करून सर्वांना सोबत घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत. त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनीही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आ. मेटेंंचे विचार तळागाळापर्यंत पोहचवावे व पक्षवाढीसाठी कार्यरत रहावे, असे आवहान केले.


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, शिवसंग्राम शहराध्यक्ष लक्ष्मण ढवळे, सुहास पाटील, कैलास माने केज तालुका अध्यक्ष लिंबराज वाघ, विद्यार्थी जिल्हा संघटक अक्षय माने, युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले, शहर युवक उपाध्यक्ष अनिकेत देशपांडे, शेषेराव तांबे, सुनील शिंदे, हरीश शिंदे, मुकुंद गोरे, संतोष पंडित, सुशांत सतराळकर, सलमान अली, श्रीकांत करंडे श्रीनिवास सावंत, दीपक सावंत आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा