Breakingपालघर : आ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली विक्रमगड तहसील कार्यालयावर हजारोंचा धडक मोर्चा


पालघर : आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विक्रमगड तहसील कार्यालयावर हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत धडक मोर्चा काढण्यात आला.


यावेळी किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन काळे कृषी कायदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच दिल्ली येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, स्थानिक जनतेच्या विविध प्रश्‍नांसाठी व पालघर जिल्ह्यात रखडलेल्या पेसा भरती बाबतच्या मागणीसाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी किसान सभा राज्य अध्यक्ष किसन गुजर, जिल्हा सेक्रेटरी बारक्या मांगात, विक्रमगड तालुका सेक्रेटरी किरण गहला,जव्हार तालुका सेक्रेटरी रतन बुधार, राजा गहाला, साई बेंदर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा