Breaking


पिंपरी चिंचवड : घरकुल वसाहतील कचरा रस्त्यावर, व्यवस्था कार्यक्षम करण्याची माकपचे किसन शेवते यांची मागणी


पिंपरी चिंचवड : कचऱ्याची गाडी रस्त्यावर येऊन कचरा गोळा करते. मात्र सदर गाडी चार बिल्डिंगच्या आत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ मध्यभागी आली तर गृहिणींना संपूर्ण कचरा विलगीकरण करून गाडी मध्ये टाकता येईल, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किसन शेवते यांनी एका निवेदनाद्वारे फ प्रभाग अधिकारी सीताराम बहुरे यांच्याकडे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, घरकुल वसाहतीतील कचरा रस्त्यावर पसरलाय. बेपर्वाईमुळे परिसर स्वछतेकडे दुर्लक्ष केेले जात आहे. त्यासाठी व्यवस्था कार्यक्षम करण्याची मागणी केली आहे.


घरकुल वसाहतीमध्ये कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक इमारतीसमोर मनपाच्या आरोग्य विभागाने फुटपाथवर निळे डस्टबिन ठेवलेले आहेत. त्या डस्टबिन पूर्ण भरतात आणि भटकी कुत्री डस्टबिनमधील कचरा रस्त्यावर आणि सर्वत्र पसरवतात. रस्त्यावर पसरलेला कचरा वेळोवेळी उचललेला जात नाही. मनपाच्या संबंधित विभागाचे सुवरवायझर परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहेत. या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे परिसरात अनारोग्य आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.


तसेच कचरा संकलन घंटा गाड्या घरकुल इमारतींच्या मध्यभागी उभ्या कराव्यात. त्यामुळे महिलांना रस्त्यावर येऊन कचरा गाडीत टाकण्याची वेळ येणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे.


निवेदनावर कॉ. किसन शेवते, सचिन देसाई, स्वप्निल जेवळे, अविनाश लाटकर, निर्मला येवले, सुषमा इंगोले, ख्वाजा जमखाने, गणेश दराडे, अपर्णा दराडे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा