Breakingपिंपरी चिंचवड : फेरीवाला सर्वेक्षण रद्द करा, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाची मागणी


पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे सन २००८, २००९, २०१२, २०१४ साली पिंपरी-चिंचवड  शहरातील फेरीवाला सर्वेक्षण करण्यात आले यात सन २००८मध्ये साधारण ७६०० विक्रेत्यांची नोंद झाली या पुढील सर्वेक्षणामध्ये विविध ठिकाणच्या सर्वेमध्ये एकुण १०५८३ विक्रेते आढळून आले. मात्र सन  २००८ च्या नोंदीत विक्रेत्याना त्यात सामावून घेतले नाही. त्यांमुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले. आधी यापुर्वीच्या लाभार्थ्यांंना एकही लाभ मिळाला नाही. त्यांंना लाभ न देताच वंचित ठेऊन त्यांचेही पुन्हा सर्वे करण्याचा घात मनपाने घातला असून हा कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल करत फेरीवाला सर्वे रद्द करुन मनपाच्या कर्मचारी यांचेकडुन सर्वे करुन ४०  हजार विक्रेत्यांचे सुमारे ४८ लाख रुपयांची बचत करुन मनपाने ही रक्कम फेरीवाला कल्याणार्थ  वापरावी, अशी मागणी नैशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने मनपा आयुक्तांकडे केली आहे. 


निवेदन देतेवेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजु बिराजदार यानी निवेदन दिले आहे.


महानगरपालिकेकडून बयोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात आले. योग्य संस्थेची निवड न केल्यामुळे चुकीच्या संस्थेला काम दिल्यामुळे आणि ज्यांंना हे काम दिले त्यानी प्रत्यक्ष काम न केल्यामुळे केवळ ५९०० फेरीवाल्यांचे बयोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात आले. ४१०० पेक्षा अधिक उर्वरित प्रतिक्षेत आहेत.  यासाठी  आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत, असे  फेरीवाला क्रांती संघटनेने म्हटले आहे.


बहुतांशी व्यवसायिक सुमारे २५ वर्षां पेक्षा अधिक काळापासून व्यवसाय करत आहेत. त्यांंना शासनाचे कायद्यानुसार लाभ मिळावा या प्रतीक्षेत आहेत. शहर समितीला अंधारात ठेवले आहे. गुणवत्तापुर्ण काम  करणारी संस्था / एजन्सीला काम न देता हितसंबंध असणा-याना काम देण्यात आल्यामुळे या सर्व अडचणीचा सामना सामन्य फेरिवाल्यांंना करावा लागत आहे.  मनपाने जाहिरात / निविदा काढून टेन्डर पद्धतीने फेरीवाल्यांचे सर्वेक्षंण, प्रमाणपत्र व ओळखपत्र असे एकुण दर चूकीचा असुन  कोणालाही प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसल्याने या पुर्वीचा वाईट अनुभव पहाता हे कांम पूर्ण होणार नाही, असे ही महासंघाने म्हटले आहे.


अर्धवट, अयोग्य पद्धतीने होणा-या सर्वेक्षणाचे काम त्वरित थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा