Breaking


पिंपरी चिंचवड : नगरसेविका अश्विनीताई जाधव यांना 'एक्सप्रेस मेडिया वूमन पुरस्कार'


पिंपरी चिंचवड : चिखली जाधववाडी प्रभाग क्र.2 च्या नगरसेविका अश्विनीताई जाधव यांना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे हस्ते 'एक्सप्रेस मेडिया वूमन 2021 पुरस्कार' प्रदान करण्यात आला.


राम कृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महापौर माई ढोरे संतोषदादा जाधव उपस्थित होते.


अश्विनीताई जाधव यांनी 2017 पासून त्यांनी प्रभागात मूलभूत समस्या सोडवण्यास सुरुवात केली. महिलांची व्यायामशाळा, युवकांसाठी क्रीडांगण, आरक्षण विकास, सुसज्ज आरोग्य केंद्र, झुंबा प्रशिक्षण, योगा शिबीर, कर्करोग, मधुमेह, रक्त तपासणी शिबीर व विविध उपक्रमांचे आयोजन केले.


कोरोना काळातही त्यांचे कार्य सुरूच होते. प्रभागातील रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण करून संपूर्ण प्रभाग स्मार्ट बनवण्यासाठी त्यांचे प्रभागात वेगाने काम सुरू आहे. त्यांंच्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा