Breakingपिंपरी चिंचवड : दिघी विकास मंच तर्फे 'मी जबाबदार, माझी जबाबदारी' जनजागृती मोहीम !

 


दिघी : कोरोना संसर्गाचा शहरामध्ये आकडा दिवसोनं दिवस वाढत आहे. आज सलग तिसर्या दिवशी रुग्ण संख्या १८०० हून अधिक झाली आहे. शहरामध्ये एकुण रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ८५३ इतकी आहे। हि सर्वांसाठीच खूप चिंतेची बाब आहे, म्हणूनच दिघी विकास मंच तर्फे 'मी जबाबदार, माझी जबाबदारी' जनजागृती मोहिम राबविण्यात आली.


नागरिकांना कोरोना बाबत काळजी घेण्यासंबंधी सूचना फलक दर्शवत आवहान करण्यात आले. तसेच निष्काळजीपणे वावरणाऱ्या महिला व पुरुषांना मास्क देऊन जबाबदारीने वापरण्यास सांगितले.


यावेळी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, सुनिल काकडे, के. के. जगताप, पुंडलिक सैंदाणे, पांडूरंग मेहत्रे, दत्ता घुले, समाधान कांबळे, नामदेव रडे, संतोष जाधव, योगेश आकुलवार, पोळ व अन्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा