Breaking


पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्राधिकरण विचार मंच तर्फे 'प्राधिकरण महिला उद्योजकता पुरस्कार' वितरण संपन्न


निगडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्राधिकरण विचार मंच निगडी तर्फे 'प्राधिकरण महिला उद्योजकता पुरस्कार' वितरण सोहळा संपन्न झाला. 


जागतिक महिला दिन व मनसे वर्धापन दिनानिमित्त निगडी प्राधिकरणमधील महिलांना  "प्राधिकरण महिला उद्योजकता पुरस्कार देण्यात आला. उद्योजक महिलांच्या घरी जाऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारमध्ये स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देवून गौरवण्यात आले. 


महिलाना घरी जाऊन त्याच्या परिवारासमोर पुरस्कार दिल्याने त्यांना आपण केलेल्या व्यवसाय उद्योगात सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त केली. तसेच पुरस्कार मिळाल्याने प्रोत्साहन मिळाल्याचे महिलांनी सांगितले.  


निगडी प्राधिकरण मधील 190 महिलांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुखाने ज्या महिला आपल्या घराची सर्व जबाबदारी पार पाडून आपल्या उद्योगाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे अशा महिला व एकदम खडतर परिस्थितीतून मार्ग काढत आपल्या घरासाठी काही तरी करण्यासाठी, महिला असूनही एक घरगुती उद्योग सुरु केला आहे अशा महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. 


पुरस्कार देतेवेळी सीमाताई शेलार, शितलताई कदम, माधुरीताई पाटोळे, शितलताई बैरागी, दिशाताई नाईक, ज्योतीताई नाईक उपस्थित होत्या.


पुरस्काराचे आयोजन मनसे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले, महिला प्राधिकरण विचार मंचाच्या स्वाती दानवले यांनी केले होते. तर पुरस्काराचे नियोजन उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, प्रभाग अध्यक्ष दिपेन नाईक, प्रसाद मराठे, ओंकार तांदळे, प्रभाग अध्यक्ष भागवत नागपुरे, शंतनु चौधरी, रुषिकेस कांबळे, जयश मोरे, आकाश काटे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा