Breakingपिंपरी चिंचवड : असंघटित कामगार काँग्रेस तर्फेे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !


पिंपरी चिंचवड : असंघटित कामगार काँग्रेस तर्फेे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस असंघटित कामगार काँग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 


असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत भोसरी विधान सभेतील इंद्रायणी नगर येथे आज भोसरी विधानसभा अध्यक्ष सौरभ खरात यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


या बैठकीला असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे, घरेलू महिला समन्वयक शितलताई कोतवाल, हातगाडी टपरी पठारी जिल्हा समन्वयक अझरुद्दीन पुणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


सोशल मीडिया विभाग जिल्हा समन्वयक मोहन उनवणे यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीमध्ये कामगारांच्या समस्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी भोसरी विधानसभेमध्ये पक्ष संघटन वाढविण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच महिलांना बचत गटांची माहिती देण्यात आली. रमेश गोरखा यांनी आभार व्यक्त केले.


यावेळी जितू कामी, विनोद बनसोडे, दिनेश सोनार, चेतन गोरखा तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा