Breakingपिंपरी चिंचवड : निगडी प्राधिकरणमध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्याची मनसेची मागणी


निगडी : निगडी प्राधिकरणमध्ये कोविड लसीकरण केंद्र लवकरात लवकर चालू करण्याची मागणी मनसेच्या वतीन 'अ' प्रभाग अधिकारी सुचिता पानसरे व आरोग्य अधिकारी सुनिता साळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


कोरोनाची सध्या परिस्थिती पाहता सर्वाना लसीकरण करावे. उन्हाळा सुरु झाला आहे. निगडी प्राधिकरण मधील जेष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी यमुनानगर किंवा मोहन नगर चिंचवड या ठिकाणी जावे लागते. प्राधिकरण मधील अनेक घरातील मुले कामानिमित्त दुसऱ्या राज्यात किंवा बाहेर देशात आहे. घरी फक्त जेष्ठ नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना वरील दोन्ही  लसीकरण केंद्र लांब पडत आहेत. त्यामुळे प्राधिकरणमध्ये लसीकरण केंद्र चालू करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी लवकरच प्राधिकरणमध्ये कोविड लसीकरण केंद्र चालू करण्याचे आश्वासन दिले. 


यावेळी मनसे उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, प्रभाग अध्यक्ष दिपेन नाईक, ऋषिकेश कांबळे, शाखा अध्यक्ष शंतनु चौधरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा