Breaking


पिंपरी चिंचवड : पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन तर्फे 'सन्मान स्त्री शक्ती पुरस्कार' वितरण सोहळा संपन्न


पिंपरी चिंचवड : पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त 'सन्मान स्त्री शक्ती पुरस्कार' वितरण सोहळा संपन्न झाला.


आज (दि.८ मार्च) दिघी पोलीस स्टेशन येथे २४ तास नागरिकांच्या रक्षणासाठी कायदाचे पालन करत  दिवस रात्र कर्तव्यदक्ष महिला पोलीस कर्मचारी ह्यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी दिघी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे, संस्थापक/अध्यक्ष गजानन चिंचवडे, युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे व संस्थेचे पदाधिकारी सागर म्हस्के, सचिन लाड, शहराध्यक्ष भाग्यदेव घुले, उपाध्यक्ष दत्ता घुले, कार्याध्यक्ष पराग जोशी, कार्तिक गोवर्धन, प्रसाद माळगावकर, वैभव हेंद्रे, चेतन घुले उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे आयोजन कार्तिक गोवर्धन यांनी व  संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा