Breaking


पिंपरी चिंचवड : इमारतीचे तुटून पडत असणारे जिने व पावसाळ्यात गळणारे टेरेस ची दुरुस्ती करा - बसपा


पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत येत असणाऱ्या प्रभाग क्रमांक १९ भाट नगर, बुद्ध नगर, अशोक नगर, पिंपरी येथील बिल्डिंग नंबर १ ते १७ मधील इमारतीचे तुटून पडत असणारे जिने व पावसाळ्यात गळणारे टेरेस ची दुरुस्ती करावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सहाय्यक आयुक्त 1 विकास ढाकणे यांच्याकडे केली आहे.


तसेच सदरील काम लवकरात लवकर करण्यात यावे, यासंबधी चर्चा त्यांच्यासोबत करण्यात आली. सदरील विषय लवकरात लवकर सोडवण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.


यावेळी बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सूरज गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, पिंपरी चिंचवड सचिव राजेंद्र पवार, ज्येष्ठ नेते प्रा. बी. बी. शिंदे, बाबासाहेब अंकुरे, जयेश लोंढे, आदित्य जोगदंड, श्रेयस दुशिंग रफेल खन्ना उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा