Breakingपिंपरी चिंचवड : भाजी मार्केट सम विषम चालवा, अन्यथा कारवाई


पिंपरी चिंचवड : शहरात आज 853 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 476 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील चार जणांचा आज मृत्यू झाला आहे. यामध्ये मोशीतील 79 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 65 वर्षीय पुरुष, पिंपळेसौदागर मधील 65 वर्षीय पुरुष आणि फुगेवाडीतील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.


1275 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1491 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 56 हजार 273 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 4403 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस आयुक्तालयाने शहरात नियमांचे कठोर पालन करा, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


प्रशासनाकडून सुचना जाहीर :


1. होम आयसोलेशनमध्ये म्हणजे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी होम आयसोलेशन नियमांचा भंग करुन  घराबाहेर फिरू नये. अन्यथा त्यांच्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.


2. ज्या सोसायटीत रुग्ण होम आयसोलेट आहे, त्या सोसायटीच्या चेअरमनला त्या बाधीत रुग्णांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. यात हलगर्जीपणा झाल्यास संपुर्ण सोसायटी सिल केली जाणार आहे.


3. दुकानांमध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला तसेच इतर कोरोना नियमांचे उल्लंघन झाले, तर संबंधित दुकान मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून ते दुकान तात्काळ सील ही केले जाईल.


4. भाजी मार्केटमध्ये समविषम पध्दतीने मार्केट चालु ठेवावे. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि कोरोना नियमांचे पालन होईल याची मार्केट असोशिएशनने दक्षता घ्यावी. अन्यथा पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा