Breaking


पिंपरी चिंचवड : सामाजिक कार्यकर्त्या प्रिती बोंडे यांना 'नारी शक्ती सन्मान पुरस्कार' प्रदान


पिंपरी चिंचवड : चिखली प्राधिकरण, राजेशिवाजी नगर, सेक्टर 16 येथील सुखकर्ता एनडीटी सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रिती बोंडे यांना महिला दिनी 2021 'नारी शक्ति सन्मान पुरस्कार' प्रदान आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना "महिला उद्योजिका" म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.


प्रिती बोंडे म्हणाल्या की, माझे पती जयंत आणि मी वाहन उद्योगातील स्पेअर पार्टच्या गुणवत्ता तपासणीचे काम करतो. त्यामुळे अनेक कंपन्यांतील कामाच्या गरजा आम्हाला कळू लागल्या. आशा कामासाठी होतकरू मुलामुलींना आणि महिलांना संधी दिली तर एक सामाजिक काम माझ्या हातून होईल असे वाटले. 2001 पासून गरजूंना कंपनीमध्ये रोजगार मिळवून देण्याचे कार्य सुरू केले. पिरंगुट, भोसरी, चाकण, रांजणगाव, तळेगाव याठिकाणी आतापर्यंत हजारो लोकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे. त्यांच्या कंपनीत 400 लोक भारतभर काम करत आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या गरिबांच्या हाताला काम मिळवून देण्यातच मला आत्मिक आनंद मिळतो.


लायन्स क्लब इंटरनॅशनल असोसिएशन डिस्ट्रिक्ट च्या सखीं मंचच्या अध्यक्षा अनुराधाताई शास्त्री यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरात गोरगरीब कष्टाळू लोकांच्या हाताला रोजगार मिळवून देणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा दरवर्षी महिला दिनी सन्मान करत असतो. प्रिती बोंडे यांनी ग्रामीण भागातून कामाच्या शोधात येणाऱ्या शेकडो मुलामुलींना आणि गरजू महिलांना रोजगार मिळवून दिला आहे.


यावेळी DCP झोन 3 च्या श्रीमती पौर्णिमा गायकवाड तसेच 'केसरी टूर्स च्या संचालिका झेलम चौबळ, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय शास्त्री, कॉर्डिनेटर लायन क्षमा शर्मा व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा