Breaking


पिंपरी चिंचवड : टाटा मोटर्स कंपनीचा फेब्रुवारीत विक्रम, 58,473 गाड्यांची विक्री


पिंपरी चिंचवड : टाटा मोटर्सने देशात फेब्रुवारी महिन्यात 58 हजार 473 गाड्यांची विक्री केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 54 टक्के एवढी आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेली विक्री ही मागील नऊ वर्षात झालेली आत्तापर्यंत सर्वाधिक विक्री असल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे.


टाटा मोटर्सने फेब्रुवारी महिन्याचा विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतात टाटाच्या 61 हजार 365 गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात 40 हजार 619 गाड्यांची विक्री झाली होती.


भारतात फेब्रुवारी 2020 मध्ये टाटाच्या 38 हजार 002 गाड्या विकल्या गेल्या तर, मागच्या महिन्यात (जानेवारी 2021) 57 हजार 742 गाड्यांची विक्री झाली होती. कमर्शियल गाड्यांमध्ये फेब्रुवारी 2021 या महिन्यात 33 हजार 966 गाड्य़ांची विक्री झाली तर, 27 हजार 225 पॅसेंजर गाड्यांची विक्री झाली.


कर्मर्शिअल गाड्यांच्या विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 21 टक्के वाढ झाली आहे आणि पॅसेंजर गाड्य़ांच्या विक्रीत तब्बल 119 टक्के वाढ झाली आहे, असं अहवालात म्हटले आहे. कोरोना काळातही नागरिका टाटाच्या गाडी खरेदीला अधिक पसंदी देताना दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा