Breaking


पिंपरी : घरकुल येथे महिला मार्गदर्शन केंद्राची स्थापना


पिंंपरी चिंचवड : घरकुल येथे जागतिक महिला दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. घरकुल मधील महिलांच्या समस्यांंवर काम करण्यासाठी वुमेन्स हेल्पलाईन फाऊंडेशन तर्फे घरकुल येथे महिला मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली.


केंद्राचे उद्घाटन अध्यक्षा नीता परदेशी यांच्या हस्ते केक कापून करण्यात आले. यावेळी अशोक मगर याच्या हस्ते बोर्डचे उद्धाटन करण्यात आले. 


यावेळी संस्थेच्या अध्यक्षा निता परदेशी यांनी "महिलांचे समस्या" या विषयावर मार्गदर्शन केले. अशोक मगर यांनी सदर कामात सर्वतोपरी मदत करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी कायदेशीर सल्लागार अॅड. सारिका परदेशी, घरकुल वुमन हेल्पलाईन अध्यक्षा अनिता अधिकारी, संतोष माळी, अण्णा सोंडेकर, खैसर खान, गोदावरी रणबावले, संध्या घोडे, दर्शना सुतार, प्रमिला सुर्यवंशी, दिपाली कुलकर्णी, दिपाली येवले व घरकुलमधील महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा