Breaking


पिंपरी : मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद !


मराठी स्वाक्षरी मोहिमेतील स्पर्धकांना गुलाबपुष्प 


पिंपरी : जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना निगडी प्राधिकरण यांच्यावतीने २७ फेब्रुवारी रोजी मराठी स्वाक्षरी स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आल्या. मनसे पिंपरी - चिंचवड शहर उपशहराध्यक्ष बाळा दानवले, महिला प्राधिकरण विचार मंचाच्या स्वाती दानवले यांनी हा उपक्रम राबविला.


या स्पर्धेमध्ये निगडी प्राधिकरणामधील नागरिकांनी मराठीत स्वाक्षरी करून व्हॉट्सअॅपवर उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मराठी भाषा संवर्धन व मराठी भाषा वाढीसाठी मोलाचा सहभाग घेतल्याबद्दल सहभागी नागरिकांना गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 


स्पर्धांचे नियोजन उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, प्रभाग अध्यक्ष दीपेन नाईक, ओंकार तांदळे, प्रसाद मराठे, वॉर्ड अध्यक्ष किरण ठुबे, शाखा अध्यक्ष ऋषिकेश कांबळे, जयेश मोरे, शंतनू चौधरी, भागवत नागपुरे, रोहित शिंदे, आकाश काटे, अजय मोरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा