Breaking


पुणे : डी. वाय. पाटील महाविद्यालय प्रशासनाकडून जबरदस्ती फी वसूली थांबवा, छावा स्वराज्य सेनेची मागणी


पुणे : डी. वाय. पाटील महाविद्यालय प्रशासनाकडून जबरदस्ती फी वसूली थांबवा, अशी मागणी छावा स्वराज्य सेनेच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.


कोव्हीड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र विद्यार्थ्यांकडून जबरदस्ती फीसाठी तगादा लावला जात आहे. परिणामी पालकवर्गांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पिंपरी, वल्लभनगर येथील डीवाय पाटील कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांकडे फि वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमिवर पालक सध्या विविध समस्यांना तोंड देत आहेत. त्यात महाविद्यालयांकडून केली जाणारी सक्ती अयोग्य आहे. याविरोधात छावा संघटनेकडून तीव्र विरोध करण्यात येत असून, महाविद्यालय प्रशासनाविरोधात धडक आंदोलन छेडण्याचा इशारा शहराध्यक्ष सौरभ सगर यांनी दिला.


पूर्ण फी भरा अन्यथा विद्यार्थांना विद्यापीठ परीक्षा अर्ज भरता येणार नाही. 2019-2020 या संपूर्ण शैक्षणिक वर्षाची फी प्रथम भरावी नंतरच परिक्षेला अर्ज भरता येईल, अन्यथा परिक्षा देता येणार नाही, असे डी.वाय.पाटील महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. लॅबोरेटरीज फी ही संपूर्ण वर्षभरासाठी सुमारे 9200 रुपये एवढे शुल्क आकारले गेले आहे. विद्यापीठ विकसित फी सुमारे 1 हजार रुपये, तसेच विद्यार्थी अॅक्टिव्हिटी शुल्क सुमारे 4 हजार रुपये एवढे अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले आहे. मात्र या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी लॅबोरेटरीज फी व अन्य किरकोळ शुल्क कोणत्या आधारे द्यावे. या शुल्कामध्ये पूर्णतः सवलत मिळावी, अशा संतप्त मागण्या पालकवर्गांकडून व्यक्त होत आहेत. 


विद्यापीठ टर्म फी 1800 रुपये आकरण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षाची निम्मी फी भरल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला विद्यापीठ अर्ज भरता येणार नाही. महाविद्यालये बंद असताना ही फी कशासाठी हा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे. 


विद्यार्थ्यांना एकूण फीमधील 50 टक्के सवलत देण्यात यावी. तसेच कोव्हीड काळात महाविद्यालय बंद असूनही, विविध कारणांसाठी जी फी आकारली गेलेली आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पूर्णतः सवलत देण्यात यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


निवेदनावर छाव स्वराज्य सेनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौरभ सगर, अनिकेत बेळगावकर, प्रतिक अलिबागकर, सुशांत जाधव, विजय माने, अतुल चव्हाण, इजाज शेख, सुरज राऊत, अंगद जाधव, आकाश शिंदे यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा