Breakingपुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटिव्ह


पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यात रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. मात्र, अशा स्थितीतही पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेली वर्षभर सौरभ राव यांनी कोरोनाशी लढण्यासाठी रणनिती आखली. पण अखेर आज त्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.


दरम्यान, सौरभ राव हे शुक्रवारी विधानभवनात अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले होते. सौरभ राव यांची कोरोना चाचणी केल्यानंतर आज दुपारी त्यांचा अहवाल आला. त्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं. त्यामुळे सौरभ राव यांच्यासोबत असलेले अनेक अधिकारी आता विलगीकरणात गेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा