Breaking


पुणे : जनवादी महिला संघटनेच्या नव्या बचत गटाचे उद्घाटन


मावळ (पुणे) : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती जागवत मावळ तालुक्यातील साई सृष्टीनगरी, सुदवडी, मावळ येथे नव्या महिला बचत गटाचे उद्घाटन करण्यात आले.


स्वाभिमानी महिला बचत गट असे नामांतर करताना कॉम्रेड अपर्णा दराडे यांनी सांगितले की, येथील सर्व महिलांना आम्ही मासिक बचतीची सवय लावली आहे. गेल्यावर्षी आम्ही रणरागिणी या बचत गटाद्वारे यशस्वी कार्य केले आहे. तुटपुंजे वेतन आणि वाढती महागाई यातून जगणे सोपे व्हावे, म्हणून ही बचत गटाची चळवळ आहे. 


बांगला देशातील बचत गट चळवळीचे प्रमुख नेते मोहम्मद युनूस यांनी प्रथम बचत गटाची संकल्पना त्या देशात सुरू करून सावकारी आणि गरिबीवर मात केली, असेही त्या म्हणाल्या. यावेळी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे पावसू कऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या.


यावेळी संध्याताई बारगजे, गणेश दराडे, सुप्रिया शिंगटे, सुप्रिया जगदाळे, अनिता कऱ्हे, वैशाली राजगुरू, अर्चना वाघमारे, संगीता उजगरे, मनीषा जाधव, श्रद्धा वाकडे व अन्य महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा