Breaking


पुणे : समाजभान त्रैमासिकाचे प्रकाशन ; सशक्त लोकसमाज निर्माण करणे हे आपल्या समोरील आव्हान डॉ. श्रुती तांबे यांचे प्रतिपादन


पुणे : सशक्त लोकसमाज निर्माण करणे हे आपल्या समोरील आव्हान आहे, असे प्रतिपादन डॉ. श्रुती तांबे यांनी केले. आदीम संस्कृती, अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र, पुणे या संस्थेच्या वतीने समाजभान या त्रैमासिकाचा प्रकाशन कार्यक्रम पुणे शहरात, साने गुरुजी, स्मारक येथे आज पार पडला. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी तांबे यांनी "वर्तमानाला भिडताना" या विषयावर मांडणी केली. 


यावेळी बोलताना त्यांनी आजच्या सामाजिक परिस्थितीचे विवेचन करताना, जागतिकीकरणाचा विरूप चेहरा स्पष्ट करतानाच, भीतीचे राजकारण, आणि लोकशाही शासनसंस्थेला निर्माण झालेले धोके, वाढलेली हिंसा आणि लैंगिक अत्याचार व वैज्ञानिक दुष्टिकोनाचा अभाव यासारखे अनेक महत्वपूर्ण मुद्दे मांडत त्यांनी आजच्या वर्तमानाचे अंतरंग व त्यामागील कारणमीमांसा स्पष्ट केली.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शरद जावडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजच्या काळातील या त्रैमासिकाचे महत्त्व विषद करतानाच शोषित, वंचित समुदायाचे प्रश्न हे त्रैमासिक मांडेलच पण त्याचबरोबर हे त्रैमासिक शासनव्यवस्थेच्या ध्येय धोरणांची ही चिकित्सा करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकाचे संपादक डॉ. हनुमंत भवारी यांनी केले तर सूत्रसंचालन अंकाचे संपादक मंडळ सदस्य डॉ. अमोल वाघमारे यांनी केले तर आभार अंकाचे कार्यकारी संपादक किरण लोहकरे यांनी केले.


यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या साधनाताई दधिच, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.अजित अभ्यंकर तसेच अंकाचे संपादक मंडळ सदस्य डॉ. विवेक घोटाळे, डॉ.कृष्णा भवारी, राही श्रुती-गणेश, मनोहर मोहरे, प्रा. मयूरी भवारी व अंकाचे कायदेशीर सल्लागार ऍड. विशाल जाधव इ. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा