Breakingपुणे : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा प्रा. विलास वाघ यांचे निधन


पुणे : सुगावा प्रकाशनाचे सर्वेसर्वा प्रा. विलास वाघ (वय - ८३) यांचे आज ता. २५ गुरुवारी करोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली असून फुले, शाहू आंबेडकरी विचारांचा सच्चा पाईक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 


प्रा. वाघ यांचा जन्म १ मार्च १९३९ रोजी झाला. १९८३ मध्ये त्यांनी उषाताई वाघ यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. १९७२ ला त्यांनी सुगावा प्रकाशनाची सुरुवात केली होती. 


प्रा. वाघ यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार होते. त्यांनी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह चळवळ, अनाथ मुलांसाठी वसतिगृहे सुरू करणे अशा अनेक सामाजिक कामांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी सुगावा प्रकाशनाच्या माध्यमातून अनेक नवोदित साहित्यिकांना संधी दिली होती. 


त्यांना अनेक वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, "महाराष्ट्र फाउंडेशन" चा समाज प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार, "इंटरनॅशनल मिशन कॅनडा"चा सुगावा मासिकाला पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा