Breaking


पुणे : शहरातील खाजगी शिक्षण संस्थांकडून होणारी पिळवणूक थांबवा, छावा स्वराज्य सेनेची शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी


शिक्षण सम्राटांनी अतिरिक्त फी वसुली स्वेच्छेने थांबवावी


पुणे : शहरातील खाजगी शिक्षण संस्थांकडून होणारी पिळवणूक थांबवा, अशी मागणी छावा स्वराज्य सेनेच्या वतीने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी बोलताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शिक्षण सम्राटांनीही फी मध्ये सवलत द्यावी, जे काही अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले आहे ते शिक्षण व्यवस्थापनाने त्वरित माफ करावे, विद्यार्थांना वर्षभरात ज्या अॅक्टिव्हिटींचा लाभ घेता आला नाही त्याचे शुल्क माफ करावे, यासाठी शासन पातळीवर अध्यादेश काढण्याची आवश्यकता नसल्याचे ही त्या म्हणाल्या.


यावेळी डी. वाय. पाटील. महाविद्यालय पिंपरी येथील व्यवस्थापनाच्या फी वसुलीसंदर्भातही वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी डी. वाय. पाटील महाविद्यालय फी वसुलीसाठी तगादा लाऊ शकत नाही व कोणत्याही विद्यार्थ्याला परिक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही गायकवाड म्हणाल्या.


फी वसुलीबाबत जर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, तर छावा स्वराज्य सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. यामाध्यमातून सर्वासामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. व या आंदोलनास महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील यांनी केले आहे. 


निवेदन देतेवेळी छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, प्रदेश संघटक विवेक अत्रे, पुणे जिल्हा आयटी प्रमुख सुलतान बागवान, नितीन पवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा