Breaking


रत्नागिरी : शिक्षक कर्मचारी यांना निवडणूक भत्ता तात्काळ अदा करा, सुशिलकुमार पावरा यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


रत्नागिरी : शिक्षक व कर्मचारी यांना ग्रामपंचायत निवडणूक भत्ता तात्काळ अदा करा, अशी मागणी बिरसा क्रांती दल कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिस्ञा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणूक कामासाठी अनेक शिक्षक व कर्मचारी यांची निवडणूक मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 15 मार्च रोजी ग्रामपंचायत मतदान झाले. त्याच दिवशी इतर सर्व जिल्ह्यात निवडणूक भत्ता कर्मचारी यांना अदा करण्यात आला होता. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात मतदान अधिकारी म्हणून काम केलेल्या शिक्षक व कर्मचारी यांना भत्ता अद्याप अदा करण्यात आलेला नाही. तेव्हा सदर निवडणूक भत्ता लवकरात लवकर शिक्षक कर्मचारी यांना देण्यात यावा.अशी मागणी पावरा यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा