Breakingतोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडा : सुशीलकुमार पावरा


रत्नागिरी : आदिवासी भागात विज कनेक्शन तोडू नका व तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडा अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंञी नितिन राऊत यांच्याकडे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे सामान्य माणसाचे व्यवसाय व उद्योगधंदे बंद झाल्याने जगणे अवघड झाले आहे. आदिवासी भागातील सामान्य माणूस हा हातमजूरी करीत जगत असतो. कोरोनामुळे कामधंदा बंद झाल्यामुळे सामान्य व गरीब लोकांच्या हातात पैसा नाही. जेमतेम उदरनिर्वाह सुरू आहे. अशा परिस्थितीत अमाप आलेले विज बील भरणे सामान्य माणसाला भरणे शक्य नाही. विज बील खकित आहे म्हणून महावितरण कंपन्या कोणतीही पूर्वकल्पना न देता आदिवासी भागात वीज जोडणी कनेक्शन बंद करत आहेत. 


तसेच घरातील मीटर काढून नेत आहेत. काही वीज कर्मचारी सामान्य माणसासोबत असभ्य व्यवहार व दमदाटी करीत आहेत. हे अत्यंत चूकीचे आहे. तेव्हा एकंदरीत स्थिती बघून वीज बील माफ करण्यात यावे व आदिवासी भागात वीज कनेक्शन तोडू नये व ज्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे. अशांना पुन्हा जोडण्यात यावे व वीज सुविधा पुरवावी अशी मागणी  बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष आणि कोकण विभाग प्रमुख सुशीलकुमार पावरा यांनी सरकारकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा