Breaking


जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा उभा करा; अन्यथा आंदोलन - राजेंद्र पाडवी


सांगली : जननायक क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा उभा करा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बिरसा क्रांती दलाचे राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


चंद्रपूर महानगरपालिकेने आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा स्थापित पुतळा हालविण्यावरुन आदिवासी समाजातून तीव्र निषेध केला जात आहे. यावरुन बिरसा क्रांती दल आणि आदिवासी संघटना  आक्रमक झाल्या आहेत.


पुतळ्याची होणारी विटंबना तात्काळ थांबवावे व पुन्हा आदरपूर्वक जननायक बिरसा मुंडा यांना विराजमान करावे अन्यथा शांत संयमी आदिवासी समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा बिरसा क्रांती दलाने दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा