Breakingसाहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर;.‘आबाची गोष्ट’ बाल साहित्य पुरस्काराची मानकरी


नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी २१  प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्यामधून आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी  विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता डॉ. चंद्रकांत पाटील , कृष्णात खोत आणि के.टी. ढाले पाटील यांचा परीक्षक मंडळामध्ये समावेश होता.


मराठी भाषेसाठी युवा पुरस्काराची लवकरच घोषणा


साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या युवा पुरस्कारांचीही आज घोषणा करण्यात आली.  एकूण १८ प्रादेशिक भाषांतील युवा लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले. येत्या काळात मराठीसह गुजराती, सिंधी, बंगाली, राजस्थानी आणि मल्याळम या भाषांसाठी युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा