Breaking



दापोलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान


रत्नागिरी : दापोली तालुक्यातील जालगाव मिसाळवाडी येथील अमोल जाधव यांच्या विहीरीत भक्ष्याच्या पाठलाग करत असताना बिबट्या विहीरीत पडला. त्या बिबट्याला मोठ्या कसरतीने वनविभागाने विहिरीबाहेर काढले व जीवदान दिले.


अमोल जाधव हे आपल्या शेतातील विहीरीत पाण्याची मोटार सुरू करायला गेले तेव्हा त्यांना विहीरीत बिबट्या पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवले.त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वनरक्षक तेथे आले व गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला विहिरीबाहेर काढले. 


बिबट्याला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक गर्दी करत जमली होती. जेरबंद केलेल्या बिबट्याला जंगलात सोडण्यात येईल असे वनविभाग अधिकारी दापोली यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा