Breakingशहादा : केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी व जनविरोधी धोरणाच्या विरोधात माकपचे आंदोलन


शहादा : शहादा येथे विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शहादा तालुका कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी व जनविरोधी धोरणाचा निषेध करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.


रेशन दुकानातुन प्रत्येकी 10 किलो धान्य मोफत द्या, रेडिमेड व शिलाई कामगारांचा घरकुला करीता वाढीव सबसिडी दोन लाख रुपये द्या, लॉकडाऊन काळातील संपुर्ण वीजबिल माफ करावे व त्याचा बोजा केंद्र व राज्य सरकारने उचलावा, सर्व वयोवृद्ध कामगारांना दरमहा रुपये 5 हजार पेन्शनची हमी द्या, सार्वजनिक उद्योग धंद्यांचे खाजगीकरण बंद करा, शहरामध्ये मनरेगा मधून शिलाई कामगारांना  काम देण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.


यावेळी सुनील गायकवाड, प्रदीप पिंपळे, दिनेश गुलाले, प्रताप ठाकरे, रवी मोरे, राजाराम ठाकरे, विश्वजीत भामरे, संजू भिल्ल, कांतीलाल शिंदे, अनिता शिंदे, दिलीप जगदेव, दीपक मोहिते, नईम सय्यद, जिराबाई ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा