Breaking


श्रीगोंदा : आदिवासी भटके विमुक्त समाजातील महिला जागतिक महिला दिनानिमित्त आल्या पुढे


महिलांना पुरुषांपेक्षा कमी  न समजता समान वागणूक द्या - विजयश्री कदम 


श्रीगोंदा (अहमदनगर) : ग्रामीण विकास केंद्र, महिला समस्या निवारण केंद्र, श्रीगोंदा तर्फे लोणी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


ज्या महिलांनी लहानपणापासून शिक्षणासाठी फार कष्ट सहन केले, लग्न झाल्यानंतरही शिक्षण चालूच ठेवले आणि त्यांनी जे स्वप्न पाहिले होते ते त्यांनी पूर्ण करून आज या महिला वकील, डॉक्टर, शिक्षिका, पोलीस, आणि समाजसेवेत कार्यरत आहेत, अशा प्रमुख आठ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांचे भारतीय संविधानाची उद्देशिका व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.  


उपस्थित महिलांमध्ये आदिवासी, भटके विमुक्त समाजातील महिलांचा सहभाग लक्षणीय होते. कारण आदिवासी भटके विमुक्त समाजातील महिला कधीच त्यांच्या आयुष्यात विविध कार्यक्रम घेण्यासाठी व महिलांना संबोधित करण्यासाठी बाहेर येत नव्हत्या. सुशिक्षित महिला ज्यांनी नोकरी केली, ज्यांनी सत्ता भोगली, अशा कोणत्याच महिला महिलांच्या अधिकारासाठी बाहेर येत नव्हत्या. कितीतरी दिवस अंधश्रद्धा रुढी- परंपरेत दडपून असलेल्या आणि येथील व्यवस्थेला बळी पडलेल्या आणि समाजात कोणतेच स्थान नसणाऱ्या अशा सर्व महिलांनी एकत्र येऊन जागतिक महिला दिन साजरा केला. 


यावेळी विजयश्री कदम, श्रीमती शेख, श्रीमती काकडे, भारती गावडे, निलोफर शेख, स्मिता सोनवणे, उर्मिला जठार, आणि ज्याेती भोसले यांचा सत्कार करण्यात आला. 


आज भारताच्या संविधानामुळेच आम्ही सर्व महिला विविध पदे घेऊन या स्टेजवर उपस्थित आहोत. आज आपण संविधानाची उद्देशिका देऊन आमचा सत्कार केला हा सत्कार अविस्मरणीय राहील आणि महिलांना पुरुषांपेक्षा कमी जास्त न  मानता पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक द्या, असे विजयश्री कदम म्हणाल्या.


 तर महिला ज्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यात गुंतून बसल्या आहेत. त्या बंधनातून सोडवण्याचा आज आपण सर्व संकल्प करू, असे ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ म्हणाले.


यावेळी लोणी व्यंकनाथ गावचे सरपंच रामदास ठोंबरे, ग्रामसेवक गायकवाड आणि ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, संतोष भोसले, मनीषा काळे, उज्वला मदने, आरती गोसावी, राजू भोसले, आसाराम काळे, संतोष जठार, गुड्डी चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनीषा काळे यांनी केले तर आभार पल्लवी शेलार यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा