Breakingसोलापूर : MPSC च्या परिक्षा घोषित केलेल्या तारखेला घ्या, SFI चे राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन


सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा ठरलेल्या तारखेलाच घ्यावेत, या मागणीला घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.


यावेळी परिक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्यात यावेत, राज्य सरकार मुर्दाबाद, राज्य सेवा पूर्व परिक्षा पुढे ढकलणारा निर्णय तात्काळ रद्द करा, असे पोस्टर झळकावत राज्य सरकारचा निषेध केला.


जिल्हा सचिव मलेशम कारमपुरी म्हणाले, राज्य सरकारने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांना बेरोजगारीच्या खाईत ढकलणारा आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्णय तात्काळ रद्द करावा.


यावेळी उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, सहसचिव श्यामसुंदर आडम, राहुल भैसे, अश्विनी मामड्याल, प्रशांत आडम, विपुल धर्मराज, ओंकार सोनके, शैलेश लोकरे, रियाज शिकलकर, घनशाम गरजे, उदय शिवणकर, गणेश लोखंडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा