Breakingपरभणी : डीवायएफआय तर्फे विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांना घेऊन तहसीलदारांना निवेदन


पूर्णा : आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) वतीने राज्यातील विद्यार्थी व तरुणांच्या प्रश्नांना घेऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 


विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक कायदा रद्द करा, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना कोविडंमुळे कालावधी अपुरा पडत आहे त्यामुळे वेळ वाढवून द्या व नवीन वेळापत्रक निश्चित करा, RTE ची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, नोकरभरतीवरील बंदी उठवून ताबडतोब भरती प्रक्रिया सुरु करा, आरोग्य विभागातील भरती घोटाळा झाल्यामुळे ती परीक्षा रद्द करून नव्याने MPSC मार्फत ती परीक्षा घ्या आणि कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रोखून कायमस्वरूपी तत्वावर भरती करा, यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.


या निवेदनावर पूर्णेतील डीवायएफआयचे नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, अजय खंदारे, जय एंगडे, पांडुरंग दुथडे यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा