Breaking


दहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणार्‍या मुख्याध्यापकाला कठोर शिक्षा करा - एसएफआय

 


सोलापूर : महाबळेश्वर येथील एका शाळेचे मुख्याध्यापक दिलीप रामचंद्र ढेबे या नराधमाने दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली, या नराधमांला कठोर शासन कारवाई तात्काळ करा, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे यांच्याकडे निवेदन द्वारे करण्यात आली.


शाळा व महाविद्यालय हे विद्यामंदिर आहे. शिक्षक आणि प्राध्यापक हे गुरू आहेत. असा समजल्या जाणाऱ्या विद्यार्थिनीवर एक गुरूच अशा प्रकारचा निर्घृण कृत्य करतोय. हि घटना अतिशय लाजिरवाणी वाटणारी घटना आहे. गुरूंनी अशा प्रकारचा कृत्य केल तर पालकांनी कोणावर विश्वास ठेवून विद्यार्थीनीना शाळा व महाविद्यालयाला पाठवणार. एकीकडे मुली जास्त प्रमाणात शिक्षणापासून वंचित आहेत. अशा घटनांमुळे मुली शिक्षणातून पूर्णपणे बाहेर फेकले जातील, असेही एसएफआय ने म्हटले आहे.


प्रत्येक शाळा व महाविद्यालयात लैंगिक छळ प्रतिबंधित समित्या गठीत करून त्या समिती मार्फत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात यावे, त्या मुख्याध्यापक नराधमाला कठोर शासन शिक्षा करण्यात यावे, अशा प्रकारच्या कृत्य करण्याचा प्रयत्न पुन्हा कोणी करणार नाही. आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, या मागण्या करण्यात आल्या.


निवेदन देतेवेळी एसएफआय जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, उपाध्यक्ष विश्वजीत बिराजदार, सहसचिव श्यामसुंदर आडम, माजी जिल्हा सचिव मीरा कांबळे, राहुल भैसे, सदस्य अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, प्रशांत आडम उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा