Breakingचुलवड गावातील नेटवर्क टाॅवर तात्काळ सुरू करा, सुशीलकुमार पावरा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


नंदुरबार : चुलवड ता. धडगांव (जि. नंदुरबार) या गावातील मागील 3 - 4 वर्षापासूनचा प्रलंबित नेटवर्क टॉवर तात्काळ सुरू करा, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, चुलवड तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार या गावात जिओ टाॅवर उभा करून 3-4 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे. तरी सदर जिओ टाॅवर अद्याप चालू करण्यात आलेला नाही. त्यामुळे चुलवड गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपरसाठी व लोकांना ऑनलाईन कामासाठी 8 ते 10 किलोमीटर अंतरावर नाईलाजाने सारखे जावे लागत आहे. 


गावात ऑनलाईन कामासाठी उपयोगी अशी इतर कोणत्याच प्रकारच्या नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यी व लोकांचे शैक्षणिक व आर्थिक  नुकसान होत आहे. ऑनलाईन कामासाठी सारखे सारखे लांबच्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे पैसा खर्च होऊन वेळ वाया जात आहे. तरी सदर समस्या लक्षात घेऊन चुलवड तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार येथील जिओचा उभा केलेला टाॅवर तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा