Breakingमलकापूर येथे वंचित आघाडीचा वर्धापनदिन उत्साहात


मलकापूर : वंचित बहुजन आघाडीचा तिसरा वर्धापन दिन मलकापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष उदयास आणला आणि सर्व वंचित बहूजनांना एकत्र करित राज्यात तिसरी आघाडी तयार करण्यात आली.


या प्रसंगी बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी वर्धापण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने वाढत आहे व निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी निर्माण होत आहे, जिल्ह्यात पुढे होणाऱ्या पं. स., जि. प. निवडणुकीत वंचितची सत्ता स्थापन करण्याचा दृष्टीने  कार्यकर्त्यानी काम करावे असे प्रतिपादन केले. या माध्यमातून मलकापूर येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केक कापून तिसरा वर्धापन दिन साजरा केला.


यावेळी जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, युवानेते संजय दाभाडे, विजय झनके, गजानन झनके, राजू शेंगोकार, विलास तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा