Breakingपुणे जिल्ह्यात लॉकडाऊन नाही, पण वाढता संसर्ग रोखण्याचे आवहान

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असला तरीही शहरात लॉकडाऊन न करण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत दिली.


पुणे शहरात केवळ संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री पवार यांनी आज शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


या बैठकीला पुणे व पिंपरी चिंचवडचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षा, दोन्ही पालिकांचे आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, दोन्ही शहरांचे पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱी उपस्थित होते.


मागील तीन आठवड्यांपासून पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. संसर्गाचा दरही वाढला आहे. यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाते की काय, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. या निर्णयाने लॉकडाऊनची भीती दूर झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा