Breakingजुन्नर तालुक्यात ५८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, गावानुसार संख्या जाणून घ्या !


जुन्नर (ता. २६) : तालुक्यात आणि राज्यात करोना कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. देशभरात महाराष्ट्र राज्यात करोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात ५८ करोनाचे रुग्ण सापडले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


यामध्ये नारायणगाव ७, ओतूर ७, हिवरे बु. ६, राजुरी ४, येडगाव ४, पिंपळवंडी ३, चिंचोली ३, पिंपरी पेंढार २, आगर २, शिरोली बु. २, वडज १, बोरी बु. १, तेजेवाडी १, आर्वी १, वरूळवाडी १, हिवरे तर्फे ना. गाव १, तांबे १, बोरी बु. १, बेल्हे १, उसरान १, आळे १, जुन्नर नगर पालिका ७ समावेश आहे.


तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ०८१ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ३८८ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २६८ असून सध्या तालुक्यात ४२५ ऍक्टिव करोना रुग्ण आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा