Breakingसमाजासमोर आगळावेगळा आदर्श : संस्थेला अर्थसहाय्य देऊन वडिलांचा स्मृतिदिन जागवला


पिंपरी चिंचवड : समाजात व्यक्ती मेल्यानंतर विविध पुजा, श्रध्द घातले जातात. परंतु पिंपरी चिंचवड येथील डॉ. किशोर खिल्लारे यांनी समाजासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. कर्मकांडामध्ये अडकलेल्या समाजात डॉ. खिल्लारे अपवाद आहेत.


स्वर्गीय वडील महादेवराव खिल्लारे ह्यांच्या स्मृतदिनानिमित्ताने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक असेलेल्या डॉ. किशोर खिल्लारे यांनी सेवाभावी संस्थेला १० हजार रुपयाची मदत निधी दिला.


गोरगरीब रूग्णांची सेवा करणाऱ्या रियल लाईफ रियल पिपल ह्या स्वयंसेवी संस्थेस अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे ह्यांच्या हस्ते संस्थेचे विश्वस्त एम. ए. हुसैन ह्यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला.


यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल होणाऱ्या गोर गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सेवा देण्याचे काम ही संस्था करते  


यावेळी भुलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती गायकवाड, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, समाजसेवक महादेव बोत्रे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा