Breakingजगभरात व्हाट्सअप आणि इन्स्टाग्राम काही काळ खंडित


पुणे : भारतात आणि जगभरात काल (१९ मार्च) शुक्रवारी रात्री व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम खंडित झाले. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करण्यात अडचण येत असल्याचे वापरकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. काही यूजर्सना व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करण्यात ही अडचण येत होत्या. 


तसेच युरोप, इंग्लंड, रशिया या देशातील अनेक युजर्स भारतात आंतरराष्ट्रीय कॉल लावून चौकशी करत होते. युरोपातील अनेक विद्यार्थी भारतात पालकांना संपर्क साधण्यासाठी व्हाट्सअप्प वापरतात.


शुक्रवारी रात्री १०.४० वाजल्यापासून जगभरात व्हॉट्सअॅप डाऊन झाले असल्याचे लोकप्रिय डाउनटाइम सर्व्हिस “डाउनडेटेक्टर” यांच्या तर्फे सांगण्यात आले आहे. जगभरातील 49 टक्के ग्राहकांना याचा फटका बसला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा