Breakingपुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग ; आगीत शेकडो दुकाने जळून खाक


पुणे : पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या ठिकाणी कपड्याची मोठी दुकाने आणि गोदामं असल्याने ती आग पसरली.


फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेली भीषण आग तीन तासांनी आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत फॅशन स्ट्रीट मार्केटमधील तब्बल 800 दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे.


अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

फॅशन स्ट्रीटवर लागलेल्या आगीची तीव्रता मोठी असून या दुर्घटनेत मार्केटचं मोठं नुकसान झालं असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त करण्यात येत आहे.


लष्कर परिसरात आग लागण्याची दहा दिवसांतील ही दुसरी घटना असून, आठवडाभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज मार्केटलाही भीषण आग लागली होती. त्यामध्ये मार्केटमधील चिकन आणि मासळी विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा