Breakingसमाजातील गोरगरीब, शोषित पिडीत आदिवासींना न्याय मिळवून देणे हि वकीलांची जबाबदारी - माजी आमदार जिवा पांडू गावित


सुरगाणा (दौलत चौधरी) : समाजातील गोरगरीब दीन, दलित, शोषित पिडीत अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देणे हि वकीलांची जबाबदारी आहे, समाजात प्रत्येकाला आत्मसन्मानाने कोणाच्याही  दबावाला बळी न पडता ताठ मानेने जीवन जगता यावे यासाठीच न्याय व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. भारतीय संविधानाने सर्वसामान्य जनतेला दिलेले अधिकार, हक्क आणि कर्तव्य याची जनजागृती समाजातील तळागाळातील जनते पर्यंत पोहचविणे हि न्याय व्यवस्थेची जबाबदारी आहे असे प्रतिपादन सुरगाणा विधानसभेचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी केले ते पंचायत समिती जवळ अॅड. निलेश जाधव यांच्या बिरसा चेंबरचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.


यावेळी आदिवासींचे मुलभूत अधिकार जल, जंगल, जमीन तसेच आदिवासी समाजावरील  अन्याय, अत्याचार या विषयी 'उलगुलान' इंग्रजा विरुद्ध बंड पुकारणारे आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माजी आमदार गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अॅड. जाधव यांनी सांगितले की, आदिवासी बांधवांना न्यायालयीन कामकाजा करीता नाशिक, दिंडोरी, औरंगाबाद, निफाड येथे जावे लागते त्याकरीता वेळ, पैसा यांचा अपव्यय होतो. याच करीता बिरसा चेबर येथे दिवानी व फौजदारी स्वरूपाचे खटले, खरेदी विक्रीचे व्यवहार, प्रतिक्षा पत्र, शपथ पत्र, जिल्हा व सत्र न्यायालयाचे केसेस, अपिल प्रकरणे, महसूल विभागातील प्रकरणे, आदिवासींचे जमीन खरेदी विक्रीचे परवानगी व्यवहार आदी कामे प्रथमच तालुका पातळीवर केली जातील. या करीता नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी कोविड नियमांचे पालन करण्यात आले.


त्यावेळी उपसभापती इंद्रजीत गावित, अॅड. निलेश जाधव, अॅड. चेतन नवले, अॅड. चंद्रशेखर बोडके, अॅड. एस. के. उगले, अॅड.तोरण देशमाने, आदिवासी बचाव अभियानाचे तालुका अध्यक्ष एन.एस.चौधरी, जलपरिषदेचे सदस्य रतन चौधरी, संजय चव्हाण,  रतन पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा