Breaking



मोठी बातमी : MPSC Exam 2021 : नवी तारीख जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. पुणे, औरंगाबाद आणि राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर येत सरकारचा निषेध केला.


मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत काल वचन दिल्याप्रमाणे, आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. 


मात्र हे सांगत असताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरेंनी प्रकाश टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 21 मार्चला ही परीक्षा होणार आहे. 


आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्यापासून पेपर गोळा करुन गढ़े बांधण्यापर्यंत नियोजन करावं लागतं. त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाचं आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत ', अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.


Click Here

MPSC पूर्व परिक्षांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मोठी घोषणा


एमपीएससी परीक्षेच्या तारखेकडे संपूर्ण विद्यार्थ्यांसह राज्याचं लक्ष लागलं होतं. आपला पाल्य जरी परीक्षेची तयारी करत असला तरी पालकांची देखील यामध्ये संयमाची परीक्षा असते. त्यामुळे साहजिकच परीक्षेच्या तारखांचा पालकांवरही परिणाम होत असतो.


चौथ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की


एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची ही पहिली किंवा दुसरी वेळ नव्हती. सलग चौथ्यांदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कोरोनाचं कारण पुढे करत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा