Breakingआखेगावच्या ग्रामसस्थांच्या वतीने ‘वंचित बहुजन आघाडीचे’ नवनियुक्त उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांचा सत्कार संपन्न


अहमदनगर (डॉ. कुंडलिक पारधी) : महाराष्ट्र राज्याची वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये प्रा.किसन चव्हाण यांची महाराष्ट्र राज्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 


सामाजिक बांधिलकी जपत आखेगावच्या ग्रामस्थांनी  कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन हा सत्कार त्यांच्या घरी शेवगाव येथे साध्या पद्धतीने संपन्न केला.


यावेळी दलित पँथर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंघटक प्रा. राहुल ससाणे यांनी प्रा. किसन चव्हाण यांचा सत्कार केला.  यावेळी किसन चव्हाण आपल्या ‘आंदकोळ’  या आत्मकथाना विषयी बोलतांना म्हणाले ; “माज्या आयुष्यात अनेक वादळे आली त्या पैकी काही वादळे ही न थांबनारी होती. ‘आंदकोळ’ हा शब्द पारधी भाषेतील आहे.” 


यावेळी आखेगावचे वंचित बंहुजन आघाडीचे कार्यकर्ते लूथर ससाणे, मिखीन ससाणे, राजन ससाणे अशोक वैरागळ, संदीप जाधव, बंडू पायघन  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा